प
्रतिनिधी : नागरी संरक्षण दल – नवी मुंबई समुह ठाणे यांच्या वतीने कल्याण येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त उपनियंत्रक विजय जाधव यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वयंसेवक महिलांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये कोपर खैरणे घणसोली विभागातून सौ.दिपाली संकपाळ / वर्षा पोपळकर / प्रगती वाघमोडे /प्रेरणा कांबळे / अनुष्का जुनघरे / सुरेखा उंबरकर यांचा सन्मान नवी मुंबई प्रमुख बुरजी साहेब व विभागीय क्षेत्ररक्षक अरुण सातपुते सर यांच्या उपस्थितीत झाला.




