ताज्या बातम्या

राज्यातील पायाभूत सुविधा बळकटीकरणावर भर : शिवेंद्रराजे भोसले

प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत. सुधारित हॅम पहिल्या टप्प्यातील कामे प्रगतीपथावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये एमएसआयडीसी मार्फत ३४ जिल्ह्यात जवळजवळ ५९७० किमी लांबीचे रस्ते सुरू करण्याचे प्रस्तावित होते, ती सर्व कामे झाली आहेत उदिष्टापेक्षा जास्त कामे सुरू केली असून केली असून ती लवकर पूर्ण करण्यात येतील असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित म्हणाले की, शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पुणे ते शिरूर उड्डाणपूल, तळेगाव- चाकण-शिक्रापूर हायवे, हडपसर यवत हायवे या कामांना आवश्यक असलेली मंत्रीमडळाची मान्यता घेवून नॅशनल हायवेची कामे गतीने पूर्ण करण्यात येतील.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top