Sunday, December 15, 2024
घरदेश आणि विदेशशिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून धनुष्यबाण गायब ३३ वर्षानंतर मतपत्रिकेत बदल होणार

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून धनुष्यबाण गायब ३३ वर्षानंतर मतपत्रिकेत बदल होणार

प्रतिनिधी (रमेश औताडे) : या २०२४ वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत कोकणात धनुष्यबाण दिसणार नसल्याने शिवसैनिकात नाराजीचा सूर उमटत आहे . कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. कोकणी जनतेने शिवसेनेला नेहमीच उर्जा दिली आहे. मात्र सत्तेच्या सारेपाठातील हा बदल शिवसेनेसाठी सुखावह ठरेल की अजून काही बदल घडवेल ! हा येणारा लोकसभेचा निकालच  ठरवेल.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. युतीत ही जागा नेहमीच शिवसेनेने लढवली. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी ही जागा भाजपला दिल्यामुळे तब्बल ३५ वर्षांनंतर लोकसभेच्या मतपत्रिकेवर भाजपचं चिन्ह दिसेल. तर ३३ वर्षांनंतर मतपत्रिकेवर शिवसेनेचं चिन्ह गायब झालेलं असेल. यंदा मतदारांना ईव्हीएमवर धनुष्यबाण दिसणार नाही.

शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंतांचे बंधू किरण सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. पण त्यांनी माघार घेतल्यानं भाजपचे नेते आणि मंत्री नारायण राणे  यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला.

१९९६ च्या निवडणुकीपासून २००९ चा एकमेव अपवाद वगळता रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेनं राखली. शिवसेनेचे उमेदवार इथून सातत्यानं विजयी होत राहिले. पण आता शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना ही जागा सेनेकडून गेली आहे. 

या मतदारसंघाची पुनर्रचना होण्यापूर्वी रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात १९८४ आणि १९८९ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपचं चिन्ह मतपत्रिकेवर होतं. त्यावेळी श्रीधर नातू यांनी निवडणूक लढवली. दोन्हीवेळा त्यांचा पराभव झाला. त्यावेळी सेना लोकसभेच्या रिंगणात नव्हती. १९९१ मध्ये सेना आणि भाजपचे उमेदवार युती म्हणून लोकसभा निवडणूक लढले होते.

स्वप्नांचं शहर आणि शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईची ओळख कधीकाळी गिरण्यांचं शहर अशी होती. मुंबईच्या गिरण्यांमध्ये लाखो कामगार काम करायचे. मुंबईत शिवसेना याच गिरणी कामगारांमध्ये रुजली. चाकरमान्यांच्या माध्यमातून शिवसेना कोकणापर्यंत पोहोचली. तिथेही सेनेची पाळमुळं घट्ट रुजली. कोकणी माणूस सेनेचा हक्काचा मतदार झाला.

रत्नागिरी-सिंधुदुर्गानं लोकसभा मतदारसंघात सेनेला कायम साथ दिली. पण आता शिंदेंनी हाच मतदारसंघ भाजपला दिल्याने कोकणातीलच नव्हे तर मुंबईतील कोकणी जनता देखील प्रचंड नाराजी व्यक्त करीत आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments