Sunday, December 15, 2024
घरदेश आणि विदेशराहुल शेवाळे यांनी घेतली राज ठाकरे यांची सदिच्छा भेट शिवतीर्थ निवासस्थानी घेतली...

राहुल शेवाळे यांनी घेतली राज ठाकरे यांची सदिच्छा भेट शिवतीर्थ निवासस्थानी घेतली भेट

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यावर पहिल्यांदाच महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ निवासस्थानी शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता झालेल्या भेटी दरम्यान आमदार सदा सरवणकर, मनसे नेते संदीप देशपांडे, माजी आमदार तुकाराम काते आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुंबई दक्षिण मध्यचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी लोकसभा निवडणुकीची रणनीती, 17 मे रोजीची महायुतीची सभा याबाबत राज ठाकरे यांनी सूचना दिल्याची माहिती राहुल शेवाळे यांनी केली.


संवेदनशील नेते राज ठाकरे

या सदिच्छा भेटी दरम्यान राज ठाकरे यांनी राहुल शेवाळे यांना दिलेल्या सल्ल्यांवरून त्यांची संवेदनशीलता दिसून आली. सध्या तापमानाचा पारा चढता असताना प्रचारात स्वतः ची विशेष काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. प्रचार करताना सोबत गार पाण्याची बाटली, आणि उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी सोबत ओला रुमाल ठेवण्याचा मायेचा सल्ला राज ठाकरे यांनी दिला.


मनसे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांची भेट प्रेरणादायी ठरली. मनसेच्या स्थापनेनंतर जवळपास 20 वर्षांनंतर राजसाहेब पहिल्यांदाच धनुष्यबाण चिन्हाला आपले मत देतील, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तसेच 17 मे च्या महायुतीच्या सभेत माननीय राजसाहेब सर्वांना मार्गदर्शन करून महायुतीच्या उमेदवारांना आशीर्वाद देतील.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments