
नवी मुंबई, कोपरखैरणे: सह्याद्री सामाजिक सेवा ट्रस्ट, कोपरखैरणे यांच्या मुख्य आयोजकत्वाखाली, माहेश्वरी प्रगती मंडळ नवी मुंबई आणि लायन्स क्लब नवी मुंबई वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य व डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात Dr. Agarwals आणि Apollo Hospitals यांचे सहकार्य लाभले आहे.
आरोग्य जागरूकता वाढवण्यासाठी आणि नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीची सुविधा देण्यासाठी हे शिबिर 16 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
शिबिरात उपलब्ध असलेल्या तपासण्या:
रँडम ब्लड शुगर तपासणी (Diabetes Test)
ब्लड प्रेशर मापन
ब्लड टेस्ट (पर्यायी – इच्छेनुसार)
बॉडी मास इंडेक्स (BMI) तपासणी
डॉक्टरांचे मोफत सल्लामसलत सत्र
हाडांची मजबुती तपासण्यासाठी बोन मिनरल डेन्सिटी (BMD) चाचणी
नेत्रतपासणी (Eye Check-up)
फुफ्फुस कार्यक्षमता तपासणी (Pulmonary Lung Function Test)
शिबिराच्या आयोजनात पुढाकार घेतलेली मंडळी:
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. फिरोज खान (अध्यक्ष), प्रतीक तरडे (उपाध्यक्ष), सतिश पाटील (सचिव), क्षितिज खानविलकर (खजिनदार), तसेच कार्याध्यक्ष राहुल त्रिंबके, संपर्क प्रमुख श्री दिपक अनावणे तसेच शेखर चौधरी व प्रतीक फणसेकर आणि सल्लागार श्री सुनिकेत देविदास हांडे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
हे शिबिर सर्व नागरिकांसाठी मोफत असून, आरोग्य तपासणीसाठी कोणतीही पूर्वनोंदणी आवश्यक नाही. अधिकाधिक नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
– ओमकार धुळप प्रतिनिधी – धगधगती मुंबई, नवी मुंबई