मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत मराठी येणे गरजेचे नाही, असे वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांचा जाहीर निषेध करून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्र.१ तर्फे बोरीवली येथे आंदोलन करण्यात आले. शिवसेना विभागप्रमुख उदेश पाटेकर व महिला विभाग संघटक सौ शुभदा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात उपनेत्या सौ संजना घाडी, माजी नगरसेवक, नगरसेविका, उपविभागप्रमुख, पुरुष व महिला शाखाप्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मराठीविरोधी वक्तव्याचा पेटला वणवा ; भैय्याजी जोशींविरोधात बोरीवलीत आंदोलन
RELATED ARTICLES