Wednesday, June 25, 2025
घरमहाराष्ट्रमुंबई, ठाणे, नवी मुंबईधारावी विधानसभाप्रमुख पदी वसंत नकाशे यांची नियुक्ती

धारावी विधानसभाप्रमुख पदी वसंत नकाशे यांची नियुक्ती

धारावी : धारावी विधानसभा क्षेत्रात आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवणारे आणि ‘आपला माणूस’ म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केलेले कार्यसम्राट नगरसेवक राजापूर केळवली गावचे सुपुत्र वसंत नकाशे यांची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने धारावी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या विधानसभा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आपला माणूस म्हणून वसंत नकाशे आप्पा संपूर्ण धारावीकरांच्या मनातील भावी आमदार अशी ओळख निर्माण केलेले तसेच कोरोना काळात स्वखर्चाने धारावीसह ग्रामीण भागातील काही खेड्यापर्यंत अन्नधान्याचे किट पोहोचवणारे कोरोना दूत म्हणून परिचित त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी घेतली होती आणि त्यांना कोरोना योद्धा हा सन्मान बहाल करण्यात आला होता.
श्री वसंत नकाशे यांची धारावी विधानसभा प्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून राजकीय,सामाजिक, विविध संस्था, मंडळाकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments