तापोळा, प्रतिनिधी (नितीन गायकवाड)
तापोळा गावाचे ज्येष्ठ नागरिक श्री. रामचंद्र धोंडीबा धनावडे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण धनावडे कुटुंबावर शोककळा पसरली असून, गावातील ग्रामस्थ आणि व्यापारी मंडळाने त्यांच्या जाण्याबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.
श्री. रामचंद्र धोंडीबा धनावडे यांनी आपल्या कष्टाने आणि अथक मेहनतीने कुटुंबाची घडी बसवली. आपल्या मुलांचे योग्य संगोपन करून त्यांना स्वबळावर उभे करण्यासाठी त्यांनी अत्यंत समर्पणाने जीवन व्यतीत केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे धनावडे कुटुंब आज सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त करू शकले आहे.
त्यांचे कार्य केवळ कुटुंबापुरते मर्यादित न राहता संपूर्ण तापोळा गावाच्या विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या निस्वार्थी समाजकार्यामुळे ते गावात एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात. त्यांचा स्वभाव प्रेमळ आणि मनमिळावू होता, त्यामुळे ते सर्वांच्या मनात आपले स्थान निर्माण करू शकले.
गळ्यात पांडुरंगाची तुळशीची माळ आणि मुखात हरीनाम या भक्तीमय जीवनशैलीने त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवा आणि ईश्वरभक्तीत व्यतीत केले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण तापोळा गावात आणि १०५ गाव समाजामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
श्री. रामचंद्र धोंडीबा धनावडे यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
शोकाकूल: ग्रामस्थ व व्यापारी मंडळ, तापोळा
तापोळा गावातील जेष्ठ नागरिक रामचंद्र धोंडीबा धनावडे यांचे दुःखद निधन
RELATED ARTICLES