कल्याण(प्रतिनिधी) : कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उद्या जनता दरबार कल्याण पूर्व विजयनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. या जनता दरबारात ते नागरिकांच्या समस्या ऐकून घेणार असून, त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचा ते प्रयत्न करणार आहेत.
कल्याण आणि आसपासच्या भागातील रहिवाशांसाठी ही एक महत्वपूर्ण संधी असून, पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, आरोग्य सुविधा, शिक्षण आणि अन्य नागरी समस्यांवर थेट खासदारांसमोर आपली मते मांडता येणार आहेत. जनता दरबारात संबंधित प्रशासनिक अधिकारी उपस्थित राहणार असल्याने अनेक समस्यांचे त्वरित निराकरण होण्याची शक्यता आहे.
डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यापूर्वीही नागरिकांसाठी अशा जनता दरबारांचे आयोजन करून अनेक तक्रारी सोडवण्यास मदत केली आहे. त्यांचा हा उपक्रम लोकांपर्यंत थेट पोहोचण्याचा आणि प्रशासनाच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण करण्याचा एक प्रभावी मार्ग ठरत आहे .
कल्याण पूर्व आणि परिसरातील नागरिकांनी या जनता दरबारात उपस्थित राहून आपल्या अडचणी मांडाव्यात, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेविका माधुरी प्रशांत काळे तसे कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रशांत काळे यांनी केले आहे.
ठिकाण: शिवसेना मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय, विजय नगर
वेळ: सायं ५ ते रात्री ८
तारीख: ५ मार्च – २०२५