ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

श्री विकास बाळासो भोसले यांना उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार.

प्रतिनिधी : ॲटलास इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कराड चे संस्थापक व मार्गदर्शक श्री विकास भोसले सर हे अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे. सर्वसमावेशक वृत्ती तसेच त्यांचा व्यवस्थापन कौशल्याची दखल घेत मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर ए. एम. देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना उत्कृष्ट उद्योजक पुरस्काराने गौरवण्यात आले. कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ अलाईड सायन्स , यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा, तसेच मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषद बायोमेक इंडिया चे औचित साधून डॉक्टर जी.आर.पठाडे, अधिष्ठता, के आय ए एस , के व्ही व्ही डी यु, कराड , यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Scroll to Top