ताज्या बातम्या

लहुजी वस्ताद साळवे पुण्यतिथी अभिवादन

मुंबई : समाजसुधारक आणि क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजसेविका सुनीता तुपसौंदर्य यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. या वेळी त्यांनी वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी कार्य करण्याचा संकल्प केला.

सुनीताताई अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील पाणीटंचाई, शिक्षण, आरोग्य आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी कार्यरत आहेत. त्यांनी मोफत आरोग्य शिबिरे, शिक्षण उपक्रम आणि जलसंधारण प्रकल्प राबवत समाजात सकारात्मक बदल घडवले आहेत.

या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. लहुजी वस्ताद साळवे यांच्या विचारांची प्रेरणा समाजासाठी दिशादर्शक आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी सुनीता तुपसौंदर्य यांनी लहुजी वस्ताद यांच्या विचारांचा जागर करण्याची आणि वंचित, शोषित घटकांसाठी कार्यरत राहण्याची ग्वाही दिली.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top