ताज्या बातम्या
बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?कराड तालुक्यातील घोगाव येथे दुर्दैवी घटना‘बेस्ट’ संपावर तातडीने तोडगा काढून ‘नीट’ परीक्षार्थींना दिलासा द्या – माजी खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

१७ फेब्रुवारीला एसएनडीटी महिला विद्यापीठाचा ७५ वा दीक्षित समारंभ

प्रतिनिधी : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा (एमएनडीटी महिला विद्यापीठ) ७५ वा पदवीप्रदान सगारंभ (दिक्षांत समारंभ) १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजता सर सीताराम आणि लेडी शांताबाई पाटकर दीक्षांत सभागृह (पाटकर हॉल), एमएनडीटी महिला विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई येथे संपन्न होणार आहे.अशी माहिती डॉ.संजय नेरकर व प्रा.मीरा देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी प्रा.शुभम सोनवणे,राजेश लिमये,राजेंद्र वाटेगावकर,मेहुल खळे आदी उपस्थित होते. सन १९१६ मध्ये भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्रीशिक्षणाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण” या ध्येयाने स्थापन केलेले हे दक्षिण आशियातील पहिले महिला विद्यापीठ आहे. विद्यापीठाचे ब्रीदवाक्य संस्कृता स्त्री पराशक्ती ” हे आहे.

या ७४व्या वार्षिक दीक्षांत समारंभात विद्यापीठातील विविध विभाग, संचालनाधीन महाविद्यालये व सैग्या तसेच सैलग्न आणि क्वायत्त महाविद्यालयांमधून एकूण १५,३४६ विद्यार्थ्यांना पदवी/पदविका प्रदान केली जाणार आहे. यामध्ये १२,०४६ पदवीधर , २,४६० पदव्युत्तर , १३० पदव्युत्तर डिप्लोम, ७०७ पदवीपूर्व डिप्लोमा आणि ३ प्रमाणपत्रे याचा समावेश आहे.

या समारंभात विद्यापीठाच्या चार प्रमुख विद्याशाखांतील १९३ अभ्यासक्रमांमधील पदवी व पदविका प्रदान केले जातील. तसेच ४६ संशोधकांना (Ph.D. Scholars) डॉक्टरेट पदवी देण्यात येणार आहे. याशिवाय ७७ सुवर्णपदके, १ रौप्यपदक, १ ट्रॉफी आणि १३५ विविध पारितोषिके प्रदान केली जातील.

महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन हे या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे या समारंभाचे प्रमुख अतिथी असतील. प्रो. (डॉ.) ज्योती पारिख, कार्यकारी संचालक, इंटिग्रेटेड रिसर्च अँड अॅक्शन फॉर डेव्हलपमेंट्स (IRADE) या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या असतील व दीक्षांत भाषण देतील.

विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव या दीक्षांत अहवाल सादर करतील. विद्यापीठाच प्र-कुलगुरू प्रा. रुबी ओझा, कुलसचिव प्रा. विलास डी. नांदवडेकर आणि परीक्षा व मूल्यमापन मंडल संचालक डॉ. संजय नेरकर यांनी सर्व मान्यवर, विद्यार्थी, पालक आणि विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्वांना दीक्षांत समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

एसएनडीटी महिला विद्यापीठाचे चर्चगेट (मुंबई), जुहू (मुंबई), पुणे, श्रीवर्धन, पालघर आणि चंद्रपूर असे पाच आवार आहेत. विद्यापीठामध्ये ३९ विद्याशाखा, १३ संचालनाधीन महाविद्यालये, २ व्यवस्थापन संस्था,११ केंद्रे, ३ कक्ष, ५ स्वायत्त महाविद्यालये आणि ३८० संलग्न महाविद्यालये आहेत, जी देशातील एकूण राज्यांमध्ये कार्यरत आहेत.

एसएनडीटी महिला विद्यापीठात १,१०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत असून ८४,३३१ विद्यार्थी घेत आहेत.

Scroll to Top