प्रतिनिधी : शिवसेना,युवासेना पुरस्कृत शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने एकतेचा संदेश देणारे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४८ वी जयंती शिवडी क्राॅस रोड येथील शिवशाही प्रतिष्ठानच्या कार्यालयात करण्यात आली.यावेळी दीप प्रज्वलित करून रोहिदास महाराजांना विनम्र अभिवादन करताना शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष व नायगांव-वडाळा विधानसभा क्षेत्राचे सहनिरीक्षक सुरेश गणपत काळे,महिला उपविभाग समन्वयक सौ.धनश्री पवार,उपशाखाप्रमुख हरीश मोरे,महिला उपशाखासंघटक श्रीमती नलिनी शेलार, महिला गटप्रमुख श्रीमती झेबा खान,ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी आकाश भिसे,इम्तियाज खान,सौऊद मस्तान,अन्वर सैय्यद, मुजाहिदभाई, आदी शिवसैनिक उपस्थित होते.




