Friday, June 20, 2025
घरमहाराष्ट्रदेशाभिमानासाठी फौजी टॅटू ने केले साताऱ्यात सुरेख सलाम

देशाभिमानासाठी फौजी टॅटू ने केले साताऱ्यात सुरेख सलाम

सातारा(अजित जगताप ) : स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी प्रत्येकांना देशाचा अभिमान वाटतो. या देशाच्या रक्षणासाठी फौजी डोळ्यात तेल घालून पहारा करत असतात .देशाच्या सीमा सुरक्षित ठेवतात. याची जाणीव ठेवून साताऱ्यातील उद्योजक महिला श्रीमती सुरेखा गडकरी- पवार यांनी स्वतःच्या मनगटावर फौजी गोंदले आहे. त्यांच्या या फौजी बद्दलच्या तळमळतेला अनेकांनी मनोभावे सुरेख सलाम केलेला आहे.
याबाबत फौजी या शब्दांमध्ये खूप मोठी ताकद आहे. आणि एक स्वप्न पाहिलेले पूर्ण झाल्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत फौजीची आठवण जतन करण्यासाठी हातावर गोंदून घेतलेला आहे. लहानपणापासून शू मार्ट च्या माध्यमातून उपजीविका करणाऱ्या श्रीमती सुरेखा गडकरी- पवार यांनी विविध विणकाम कला सुद्धा आत्मसात केलेली आहे त्याचबरोबर चप्पल विक्रीच्या दुकानांमध्ये चप्पल शिवण्यापासून ते बूट पॉलिश करण्यापर्यंत काबड कष्ट करत आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, अशा लढाऊ महिला हे त्यांचे प्रेरणास्थान आहे हम भी कुछ कम नही हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. सामाजिक कार्यातही सिंहाचा वाटा उचलणाऱ्या या कर्तबगार महिलेला खूप मोठी उद्योगाची संधी देण्यासाठी विविध पतसंस्था वित्त संस्थेने अर्थसहाय्य करावे आणि त्यांच्या कलागुणाला वाव द्यावी अशी मागणी जेष्ठ नागरिक व इतरांनी केलेले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments