ताज्या बातम्या

वडूज परिसर हायमास्टच्या प्रकाशाने उजळणार – नगरसेविका स्वप्नाली गोडसे

वडुज (अजित जगताप) : खटाव तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडूज नगरीचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे. नागरी सुविधांसाठी कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज नगरपंचायतीने विकास कामे करून दाखवले आहेत. त्याचाच भाग म्हणून वडूज परिसरात रस्त्यावर हायमास्टने वडूजकरांचे स्वप्न पूर्ण झालेले आहे. या हायमास्टच्या प्रकाशाने वडूज नगरी उजळून निघणार अशी माहिती नगरसेविका सौ .स्वप्नाली गणेश गोडसे यांनी वडूज येथे सांगितले.
वडूज नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक, वडूज बस स्थानक, पुण्यशोल्क अहिल्याबाई होळकर चौक, हुतात्मा चौक या चारही ठिकाणी हायमास्ट च्या प्रकाशाने अंधार नाहीसा होणार आहे. प्रत्येक विद्युत खांबाची उंची ५० फूट असून या ठिकाणी बारा २०० वॅट बल्ब बसविण्यात येणार आहे. त्याचे युद्ध पातळीवर काम सुरू झाले आहे.
वडूज बस स्थानक व परिसर उजेडात येणार आहे. वडूज नगरीच्या अनेकांनी अंधार नाहीसा करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला यश आल्यामुळे खऱ्या अर्थाने जय हो म्हणावे लागत आहे .अशी माहिती सौ स्वप्नाली गणेश गोडसे यांनी दिली.
ग्रामविकास व पंचायत राज कॅबिनेट मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालक मंत्री नामदार जयकुमार भगवानराव गोरे यांच्या प्रयत्नातून विकास कामे गतीने झालेली आहेत. यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवक नगरसेविका त्याचबरोबर नगराध्यक्ष यांचीही मोलाचे योगदान आहे. नगरसेविका सौ स्वप्नाली गोडसे यांनी प्रभाग क्रमांक १३ मध्ये ग्रामविकास व पंचायत राज व सोलापूर जिल्हा पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केल्यामुळे खऱ्या अर्थाने वडूज नगरीत विकास होत आहे. वडूज बस स्थानक आता उजाळून निघणार आहे. याचे मनस्वी समाधान वाटत असल्याचे खटाव तालुक्यातील आलेल्या प्रवाशांनी सांगितले. भविष्यात संपूर्ण माण खटाव तालुका सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

_____________________________
फोटो -वडूज नगरीमध्ये हायमास्ट बसवण्याची माहिती देताना श्री गोडसे व मान्यवर (छाया – अजित जगताप वडूज)

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top