ताज्या बातम्या

धगधगती मुंबईचे पत्रकार महेश कवडे यांच्या पाठपुराव्याला यश; बोरगाव फाटा येथे दिशादर्शक  फलक लागला 

प्रतिनिधी : धगधगती मुंबईचे पत्रकार महेश कवडे यांनी सतत पत्रव्यवहार आणि सोशल मीडियावर “बोरंगाव फाटा येथे” दिशा दर्शक फलक अनेक वर्षांपासून मोडला आणि गायब झाला आहे, त्यामुळे अनेक मुबंईतील प्रवाशी चाकरमानी याना रस्ता न दिसल्या मुळे पुढें जावं लागत आहे, त्यामुळे वाहतूक खर्च आणि वेळ यामुळे वाया जात आहे. असे असे वारंवार पत्रव्यवहार करून प्रशासन आणि स्थानिक आमदार यांना विनंती केली असता, याची दखलं नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार मनोज दादा घोरपडे यांनी घेऊन तात्काळ ” बोरंगाव फाटा” येथे दिशादर्शक फलक लावण्यात आला आहे. त्यामुळे समस्त बोरंगाव, अपशिंगे,खोजेवडी,देशमुख नगर, तारगाव, फत्यापुर,कामेरी गावकरी आणि मुबंईकराच्या वतीने नवनिर्वाचित आमदार मनोज दादा घोरपडे यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत. व त्याचबरोबर पत्रकार महेश कवडे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याबद्दल त्यांचे ही सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top