https://youtu.be/jNd_nXolVec?si=p9Jq_nSxVOyrqjcn




प्रतिनिधी : राज्य सरकारने धारावी पुनर्विकासाबाबत अदानी ग्रुप साठी काम दिल्यानंतर धारावीतील झोपडपट्टीमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू झाले जवळजवळ 80 हजार झोपड्या वरती नंबर टाकण्यात आले आहेत. मात्र धारावीकरांना विकासाकडून नक्की काय दिले जाणार आहे किती चौरस फुटाचे घर दिले जाणार आहे कोण कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याबाबत अद्याप धारावीकरांना अंधारात ठेवण्याच्या निषेधार्थ धारावीतल्या काही भागांमध्ये आज हे सर्वे होऊ दिला जात नाही. मात्र अदानी ग्रुप कडून मोठ्या प्रमाणात सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. ही भीती लक्षात घेऊन धारावीतील जनतेने आज डीआरपीपीएल या कार्यालयावरती धडक मोर्चा काढला होता आणि जाब विचारण्यात आला
धारावी मध्ये सर्वे च्या नावाने DRPPLC च्या माध्यमातून झोपडीधारकांना माल्यावरच्या भाडोत्रीना सुद्दा घर देण्याचे अमिश दाखवून सर्व झोपडी धारकांचे कागदपत्रे घेत आहेत. धारावी मधील ज्या सेक्टर मध्ये जो झोपडीधारक आहे त्याला कोणत्या ठिकाणी अर्थात धारावी मध्ये घर देणार का ? अशा पद्धतीचे कोणतेही लिखित आश्वासन न देता घराची कागदपत्रे घेतली जात आहेत. ते कशासाठी याची माहिती घेण्यासाठी रहिवाशासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
चौकट
जनकल्याण विकास समिती ५०० रहिवाशी मीटिंग साठी उपस्थित होते. सर्व सभासदांनी आपापल्या शंका उपस्थित केल्या परंतु सदर कंपनी च्या अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारे लिखित अथवा ठोस आश्वसन दिले नाही. लोकांना स्वप्न दाखवून पोलिसाच्या धाक व आमिष दाखवून सर्व्हे करीत आहे. तेथील लोकांनी आम्ही कोणतेही कागदपत्रे देणार नाही जो पर्यंत आम्हाला आमचे राहते घर ज्या ठिकाणी आहे त्या सेक्टर मध्येच देणार असे लिखित देत नाही. तोपर्यंत आमच्या सोसायटी चे कार्यकर्ते तसेच सेक्रेटरी अनिल शिवराम कासारे सांगत नाही तो पर्यत आम्ही देणार नाही.