प्रतिनिधी : लॉटरी विक्रीवर लाखो मराठी कुटुंबाचा उदरनिर्वाह असल्यामुळे याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत येत्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल, लाखो लॉटरी विक्रेत्यांना बेरोजगार करणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य पेपर लॉटरी बंद करण्यात येऊ नये, या मागणीसाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात शिवसेना लॉटरी विक्रेता सेना व लॉटरी बचाव कृती समितीची बैठक पार पडली.
आमदार सुनील शिंदे, लॅाटरी आयुक्त प्रेरणा देशभुतार,अपर मुख्य सचिव (वित्त)वित्त विभाग ओमप्रकाश गुप्ता व अध्यक्ष मनोज वारंग,सरचिटणीस सिघ्देश पाटील,खजिनदार अविनाश सावंत ,सदस्य संतोष तोडणकर,विश्वजीत मयेकर व लॉटरी बचाव कृती समिती सदस्य चंद्रकात मोरे,स्नेहल कुमार शाह,गणेश कदम,विलास सातार्डकर,दिलीप धुरी उपस्थित होते.
इतर राज्यात लॉटरी विक्री मोठया प्रमाणात सुरू होत असताना आपल्याकडे पारदर्शकपणे सोडत होऊनही महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. यावर लाखो कुटुंबांच उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे ती बंद पडू नये या प्रमुख मागणीसाठी
शिवसेना लॉटरी विक्रेता सेना व लॉटरी बचाव कृती समितीने पुढाकार घेतला आहे.




