ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

अर्थसंकल्पातून करदात्यांना मोठा दिलासा, 12 लाखवाल्यांना नो टेन्शन… 

प्रतिनिधी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला असून त्यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर मोदी सरकार करदात्यांना पावले असल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून करदात्यांना मोठा दिलासा देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. ज्यांचे उत्पन्न 12 लाखांपर्यंत आहे, आशा व्यक्तींना करमुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या या कररचनेच्या घोषणेनंतर सर्वसामान्य आणि नोकरदारवर्गाला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केल्याने सरकारला एक लाख कोटींचा तोटा होणार आहे. नव्या कररचनेनुसार 0 ते 4 लाख उत्पन्नावर 0 टक्के कर, 4 लाख ते 8 लाखा वर 5 टक्के, 8 लाख ते 12 लाखा वर 10 टक्के, 12 लाख ते 16 लाखा वर 15 टक्के, 16 लाख ते 20 लाखा वर 20 टक्के आणि 20 लाख ते 24 लाखांवर 25 टक्के कर आकारण्यात येईल. तर 24 लाखाच्या पुढे 30 टक्के कर आकारण्यात येणार आहे. पूर्वी तुमचं उत्पन्न 10 लाख असेल तर तुम्हाला 50 हजार कर भरावा लागत होता. तर आता तुम्हाला कोणताही कर द्यावा लागणार नाही त्यामुळे तुमचा 50 हजारांचा फायदा होणार आहे.

Scroll to Top