ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

कापडी पिशवीला हॅलो तर प्लास्टिक, कॅरी बॅगला करा बाय वाई पंचायत समितीत हळदीकुंकू समारंभात वाण म्हणून कापडी पिशव्या

वाई(प्रतिनिधी) : प्लास्टिक कचरा निसर्गासह मानवी जीवनाला घातक ठरू लागला आहे. महिलांनी यापुढे प्लास्टिक वापर न करण्याचा संकल्प करावा. आता पर्यावरण पूरक असलेल्या कापडी पिशव्यांचा नियमित वापर करावा . प्रत्येक महिलेने आता कॅरी बॅग, प्लास्टिकला बाय बाय करावे,”असे आवाहन रुपाली परिट यांनी केले.

सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आघाडीवर असलेल्या वाई पंचायत समितीत गटविकास अधिकारी विजयकुमार परिट यांच्या पत्नी रुपाली परिट यांच्या संकल्पनेतून महिला कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन हळदीकुंकू समारंभ आयोजित केला होता. यावेळी वाण म्हणून चक्क कापडी पिशव्या वाटण्यात आल्या.

यावेळी रूपाली परीट यांनी ,” जगभरातील प्लास्टिक कचरा हा घातक ठरू लागला असून त्यामुळे आता कॅरी बॅग वापर न करण्याचा निर्णय प्रत्येक व्यक्तीने करण्याचे वेळ आली आहे, असे सांगून कॅरी बॅग वापर टाळून पर्यावरण पुरक असलेल्या कापडी पिशव्यांचा स्वतः वापर शुन्य करा आणि इतरांना वापर करण्यासाठी आग्रह धरा, याबाबत उदाहरणे देत कापडी पिशव्यांचा वापर हा आदर्श निर्माण करणारा नवा संकल्प प्रभावीपणे सांगितला.

हा समारंभ यशस्वीतेसाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती रुपाली कुदळे, वयगाव ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती श्रीदेवी नुले यांनी परिश्रम घेतले. महिला अधिकारी, कर्मचारी यात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

.

Scroll to Top