प्रतिनिधी : आष्टा येथील स्वामी विवेकानंद सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य व सत्यशोधक महिला विचार मंच महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विजय चांदणे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात आपले मनोगत व्यक्त करताना चांगल्या होतकरू तसेच समाजात निरपेक्ष पणे कार्य केलेल्या आणि विविध विचारधारा अवगत असलेल्या मान्यवरांचा योग्य त्यावेळी सन्मान झाला पाहिजे त्यांना पुरस्कृत केलं पाहिजे आणि याच पुरस्काराने त्यांच्या कार्याची आणि कर्तुत्वाची जबाबदारी वाढते असे ते म्हणाले.
उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, कला, शैक्षणिक, वैद्यकीय, पत्रकारिता, अशा विविध क्षेत्रातील पुरस्काराने मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं, कार्यक्रमास जनसेवा मल्टीस्टेट को – ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक मा. संदीप माळी, दिनकर वायदंडे, शहाजी कांबळे, आष्टा पोलीस स्टेशनचे गोपनीय अधिकारी दीपक पाटील, पोलीस नाईक रणजित टोमके, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. विजय दणाणे, नेताजी मस्के, संदीप घस्ते, संपत कांबळे, प्रतिश चोपडे, नितीन लोखंडे, गणेश पवार, बाबासो जाधव व सत्यशोधक महिला विचार मंचाच्या कविता घस्ते, सोनाली कोळी, कविता कांबळे, निशा वळवडे, अरुणा कांबळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पुरस्काराने माणसाच्या कार्य आणि कर्तुत्वाची जबाबदारी वाढते – डॉ. विजय चांदणे
RELATED ARTICLES