ताज्या बातम्या

डाॅ.संदीप डाकवे यांना प्रगती चॅरिटेबल ट्रस्ट चा समाजरत्न पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांना प्रगती चॅरिटेबल ट्रस्ट वडजाईनगर यांच्या वतीने समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. वडजाईनगर, मालदन (ता.पाटण) येथे रविवार दि.26 जानेवारी, 2025 रोजी दुपारी 3.30 वाजता प्रा.ए.बी.कणसे, लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत पाचुपते व मान्यवर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार डाॅ.संदीप डाकवे यांना प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. डाकवे यांनी स्पंदन ट्रस्ट च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासताना गरजूंना सुमारे एक लाखापेक्षा जास्त रकमेची रोख आर्थिक मदत केली आहे. यापूर्वी डॉ. संदीप डाकवे यांना उत्कृष्ट पत्रकारितेसाठी महाराष्ट्र शासनाचे 6 पुरस्कार मिळाले आहेत.
डाॅ.डाकवे यांच्या नावाची नोंद वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड, हायरेंज बुक ऑफ रेकाॅर्ड, इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड, द ग्रेटेस्ट इंडियन या पुस्तकात झाली आहे
डाॅ.संदीप डाकवे यांनी पत्रकारितेसोबत 60 च्यावरती विविध पुस्तके, मासिके, दिवाळी अंक, नियतकालिके, अहवाल, स्मरणिका इ.ची कल्पक मुखपृष्ठ साकारली आहेत. .
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांना समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top