प्रतिनिधी(भीमराव धुळप) – केळवली निखरेवाडी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी येथील ग्रामपंचायत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक असलेले श्री विठोबा सिताराम नकाशे यांची उपसरपंचपदी बहुमताने बिनविरोध निवड झाली त्यांच्या या निवडीने त्यांच्यावरती सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
विठोबा नकाशे हे देव गांगेश्वर देवस्थान समितीचे सचिव आहेत. त्याचबरोबर निखरे विकास सेवा मंडळाचे सल्लागार देखील आहेत. त्यांच्या वरील संस्थेमधील कार्य व मागील तीन वर्ष ग्रामपंचायत मध्ये करत असलेल्या कार्याची दखल घेऊन केळवली ग्रामपंचायत मधील असलेल्या सर्व ग्रामस्थांच्या आशीर्वादाने श्री विठोबा सिताराम नकाशे यांची बहुमताने उपसरपंच पदी नेमणूक केली. या नेमणुकीबद्दल विश्राम राघोशेठ नकाशे परिवारातर्फे सर्व ग्रामस्थांचे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मनःपूर्वक आभारी आहोत.
राजापूर केळवली ग्रामपंचायत उपसरपंच पदी विठोबा नकाशे यांची बिनविरोध निवड
RELATED ARTICLES