Sunday, August 24, 2025
घरमहाराष्ट्रअन्यथा तीव्र आंदोलन व काम बंद चा इशारा महानगर गॅस...

अन्यथा तीव्र आंदोलन व काम बंद चा इशारा महानगर गॅस कंपनीतील कामगार आक्रमक

मुंबई : राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या वतीने, महानगर गॅस लि. या कंपनीतील ठेकेदार कामगारांच्या विविध अडचणींची सोडवणूक करण्यासाठी कामगार नेते, माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी महानगर गॅस लि. कंपनीच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा मुंबई येथे शुक्रवारी १७ जानेवारी २०२५ रोजी प्रत्यक्ष भेट दिली व कामगारांच्या मागण्या बाबत महत्वपूर्ण चर्चा केली व मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन व काम बंद चा इशारा दिला.

द्वारसभा घेवून सभासद कामगारांशी संवाद साधला. त्यामध्ये कामगारांना दैनंदिन कामकाजामध्ये येणाऱ्या अडचणी, वेतनवाढ, बोनस मिळत नाही तसेच उपदान (ग्रॅच्युईटी) मिळत नाही याबाबत चर्चा केली.

कामगारांच्या प्रश्नावर व्यवस्थापन प्रतिनिधी आत्माकुर चक्रपाणी, उमेश कर्डीले यांचेसमावेत चर्चा केली असता व्यवस्थापन कामगार कायदे राजरोसपणे पायदळी तुडवित असल्याने निषेध व्यक्त करण्यात आला.

कामगारांना त्वरीत वेतनवाढ करणे, विमा संरक्षण देण त्यामध्ये सर्व कुटुंबियांचा समावेश करणे, सेवा समाप्तीनंतर कामगारांना कायदयानूसार उपदान (ग्रॅच्युईटी) देणे, बोनस देणे, सुरक्षा उपकरणे उपलब्ध करून देणे अशा अनेक कायदेशीर बाबींवर चर्चा झाली. यामध्ये अनेक कायदेशीर मागण्या व्यवस्थापनाने मान्य केल्या आणि पुढील बैठक बुधवार २२ जानेवारी २०२५ रोजी घेवून उर्वरीत मागण्यांबाबत चर्चा करू असे स्पष्ठ करण्यात आले.

संघटनेचे सरचिटणीस विठ्ठलराव गोळेसाहेब, संघटना उपाध्यक्ष सागर भाउ पडगळ, संघटना पदाधिकारी रूपालीताई शिंदे तसेच संघटना सल्लागार राजेंद्र बोराडे, सचिव गोरख पवार कामगार प्रतिनिधी रहीम शेख, गोपाळ कुडेकर, उत्तम साळवी, भरत यादव सुर्यकांत नवले, शिरीष जाधव, संतोष पाटील, सुनिल कदम, राजेश तिवारी, रमाकांत जाधव, पोपट कदम आणि बहुसंख्य सभासद कामगार उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments