सातारा(अजित जगताप) : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता व स्कूल बसची माहिती पालकांना देणे बाबत सर्वच पालक वर्गाने मागणी केल्यामुळे आज सातारा जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक शिक्षणाधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते अझर मणेर व काही पालकांनी निवेदन दिले
महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांमध्ये अभ्यासक्रम व अत्याधुनिक शिक्षण पद्धत यामुळे विद्यार्थ्यांना सातत्याने घराबाहेर राहावे लागते. काही वेळेला घर ते शाळा या अंतरासाठी पालक वर्ग स्कूल बस करतात व निर्धास्त राहतात. परंतु अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अल्पवयीन विद्यार्थीनी यांचा विनयभंग झाल्याच्या तक्रारी वाढू लागलेली आहेत. काही वेळेला विद्यार्थी शांत व अबोल झाल्यानंतरच जास्त चौकशी केल्यानंतर अनेक गंभीर घटना उघडकीस झालेले आहेत.
सातारा जिल्ह्यात यावर धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. पर्याय म्हणून आपल्या विद्यार्थी कुठल्या स्कूल बस मध्ये आहे? विद्यार्थिनी कोणत्या स्कूल बस मधून कुठपर्यंत पोहोचले आहेत. याची अद्यावत माहिती पालकांना मिळावी. असे अँप विकसित झालेले आहे. त्याचा वापर करण्यासाठी आदेश निघावेत असे त्यांनी सांगितले.
या ॲपच्या माध्यमातून गुन्हे कमी करण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे. म्हणूनच एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून याबाबत सातारचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सर्व शिक्षण संस्थेच्या प्रमुखांशी कॉर्डिनेट करून निर्णय घ्यावा. अशी मागणी सातारा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक अझर मणेर यांनी निवेदनाद्वारे केलेले आहे.
सध्या माता-भगिनी ही स्कूल बस चालवण्यासाठी व सहाय्यक म्हणून काम करण्यासाठी सक्षम झालेले आहेत. त्यांचाही या कामासाठी आवर्जून उपयोग करावा यासाठी प्रजासत्तक दिन दिनांक २६ जानेवारी रोजी याबाबत सातारा जिल्ह्यातील सर्व शाळा प्रमुखांची दुपारच्या वेळेला अधिकाऱ्यांसमोर तातडीने बैठक घ्यावी. अशी त्यांनी विनंती केलेली आहे. सदर निवेदनाच्या प्रती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक, सातारा जिल्हा शिक्षणधिकारी( माध्यमिक) व (प्राथमिक) यांना पाठवलेल्या आहेत.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनिलभाऊ राठी,जुबेर मणेर ,फय्याज मणेर ,अबिद बागवान ,युनूस शेख,हाजी नदाफ,इम्रान शेख,राहुल माने,अतुल भोसले, मन्सूर शेख, अफजल शेख,प्रदीप अडसूळ व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————
स्कूल बसचा प्रतीकात्मक फोटो
साताऱ्यातील स्कूलबस बाबत पालकांना माहिती व्हावी याकरता निवेदन….
RELATED ARTICLES