प्रतिनिधी : बँक ऑफ महाराष्ट्रचे सरव्यवस्थापक अतुल चिंतामण जोशी (वय ५८) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. तब्बल ४० वर्षांहून अधिक काळ ते महाबॅंकेच्या सेवेत होते. या कालावधीत पुण्या-मुंबईसह गोवा आणि कोकणातील भिरा या ठिकाणी जोशी यांनी विविध अधिकारपदे भूषवली. सर्वांच्या मदतीसाठी धावून जाणारे हरहुन्नरी अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता. महाबँकेसह विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडाविषयक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असे. बँकेच्या फुटबॉल संघातून ते अनेक वर्षे फुटबॉल देखील खेळले. नूतन मराठी विद्यालयाच्या नूमवीय या माजी विद्यार्थी संघटनेसमवेत त्यांनी अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
महाबँकेचे सरव्यवस्थापक अतुल जोशी यांचे निधन
RELATED ARTICLES