Monday, August 25, 2025
घरमहाराष्ट्रजगेन तर मातंग समाजासाठी .... मरेन तर मातंग समाजासाठी; ४३...

जगेन तर मातंग समाजासाठी …. मरेन तर मातंग समाजासाठी; ४३ वा क्रांतीचक्र मातंग परिवर्तन दिन

मुंबई(रमेश औताडे) : १७ जानेवारी हा दिवस मातंग समाजाच्या जिवनातील अतिशय महत्वाचा दिवस समजला जातो. कारण याच दिवशी म्हणजेच १७ जानेवारी १९८२ रोजी क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले साहेब यांनी आपली पत्नी त्यागमाता क्रांतीज्योती कुसुमताई बाबासाहेब गोपले यांना सोबत घेऊन व मातंग समाज एकत्र करुन मातंग ऋषीच्या साक्षीने मोहने गाव ता. कल्याण जिल्हा ठाणे येथे शपथ घेतली की,

आजपासुन मी ‘जगेन तर मातंग समाजासाठी आणि मरेन तर मातंग समाजासाठी ‘ आणि त्या दिवशी अखिल भारतीय मातंग संघ या सामाजीक संघटणेची स्थापना केली. तेंव्हा त्यांनी आपल्या जीवन प्रवासातील प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण मातंग समाजाच्या सेवेत घालविला

शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या घेतलेल्या प्रतिज्ञेवर ठाम राहिले आणि त्यांच्या पच्छात माता कुसुमताई याही आपल्या पतिसोबत घेतलेल्या प्रतिज्ञेवर ठाम आहेत.
आजही त्या समाज कार्यात कसलीही दिरंगाई न करता समाज कार्य करत आहेत.

पुर्वीच्या काळी मरगळलेला मातंग समाज आज त्यांच्या त्यागामुळे, बलीदानामुळे आज प्रगती पथावर आहे. १७जानेवारी १९८२ पासुन आपण हा क्रांतीचा दिवस समजुन दरवर्षी हा दिवस ‘मातंग समाज क्रांती चक्र परिवर्तन दिन म्हणुन साजरा करतो.

म्हणुन १७ जानेवारी २०२५ हा ४३ वा क्रांतीचक्र परिवर्तन दिन तमाम मातंग समाजाने आपापल्या परीने साजरा करावा असे आवाहन अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी, बाबासाहेब गोपले सेना, भारतीय टायगर सेना, विलास गोपले विद्यार्थी सेना राष्ट्रीय नेत्या,त्यागमाता, क्रांतीज्योती कुसुमताई बाबासाहेब गोपले यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments