Saturday, August 23, 2025
घरमहाराष्ट्रसाताऱ्यात चार मंत्री पण चिमुकलेल्या जि. प. मध्ये न्यायासाठी आंदोलन

साताऱ्यात चार मंत्री पण चिमुकलेल्या जि. प. मध्ये न्यायासाठी आंदोलन

सातारा(अजित जगताप) : सातारा तालुक्यातील घाडगे हॉस्पिटल, नागठाणे या ठिकाणी हलगर्जीपणामुळे एका बालकाला जीव गमवावा लागला. याबाबत कारवाई व्हावी. म्हणून गेल्या वर्षभर पालक लोकशाही मार्गाने न्याय मागणी करत आहेत. आज सातारा जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालया बाहेर अडीच महिन्याच्या चिमुकल्यालाच त्याचे आई-वडील व नातेवाईकांनी आंदोलन केले. दरम्यान ,सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे याबाबत भाष्य करता येत नाही. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांनी अनाधिकृत रित्या बोलताना सांगितले.
नागठाणे येथील घाडगे हॉस्पिटल या ठिकाणी प्रसूतीसाठी आलेल्या एका नवजात बालकाचा हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला होता सदर घटना 1१ फेब्रुवारी २०२३ रोजी घटना घटली होती. त्यानंतर सातत्याने डॉक्टरवर सदोष मनुष्यवादाचा कलम ३०४ अंतर्गत दाखल केला त्यांच्यावरती ३०२ लावण्यास परवानगी देण्यासाठी न्यायालयात झगडावे लागले. या सर्व गोष्टी असताना सुद्धा अद्यापही सदरचे घाडगे हॉस्पिटल सुरू असल्यामुळे अनेकांच्या जीविताला धोका निर्माण झालेले आहेत. असे आंदोलनकर्ते सोमनाथ बळवंत पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात चार कॅबिनेट मंत्री असताना अडीच वर्षाच्या बालक असे त्याच्या मातापित्यांना नातेवाईकांना या आंदोलन करण्याची वेळ आली हेच फार भयानक असून लोकशाहीची थट्टा होत आहे. सदर आंदोलनाला अडीच महिन्याच्या बालकालाही बसवण्यात आल्यामुळे अनेकांचे त्या बालकाबद्दलची सहानभूती दिसून आली तरी या आंदोलनासाठी नेमकं काय करावं हे मात्र कुणालाच समजू शकलेले नाही.

———————————————
फोटो सातारा जि प कार्यालयात आंदोलनासाठी बसलेले बालक व पालक (छाया- अजित जगताप,सातारा)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments