Saturday, August 23, 2025
घरमहाराष्ट्रसातारा जिल्ह्यात शिवसेना आरोग्य सेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या आज निवडी

सातारा जिल्ह्यात शिवसेना आरोग्य सेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या आज निवडी

सातारा(अजित जगताप) : मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सातारा जिल्ह्यामध्ये आरोग्य सेनेच्या माध्यमातून काम करणाऱ्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या गुरुवार दिनांक जानेवारी रोजी दुपारी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार आहे शिवसेना या पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील अनेकांनी खूप मोठे योगदान दिलेले आहे. सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा असून या ठिकाणी शिवसेनेने पहिला खासदार पहिला आमदार देण्याचे काम केलेले आहे. यात जिल्ह्यात आता कार्याध्यक्ष उद्योग बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेनेचे काम सुरू आहे.

शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेना सातारा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांना कळवण्यात येते की गुरुवार दि.१६ जानेवारी रोजी रोजी दुपारी २ वाजता सातारा शासकीय विश्रामगृह येथे आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष श्री.किशोर जी ठाणेकर यांच्या अध्यक्षते खाली व शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री.जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ यांच्या उपस्थितीत सातारा जिल्हा शिव आरोग्य सेनेची नवीन नेमणुका पत्र वाटप केले जाणार आहे.
अत्यंत महत्त्वाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठक आरोग्य सेनेच्या सर्व पदावर असलेल्या पदाधिकाऱ्यांना अनिवार्य(कम्पल्सरी) उपस्थिती महत्त्वाची आहे. तरी सर्व पदाधिकारी यांनी कोणतेही कारण न देता आवर्जून सातारा येथील शासकीय विश्रामगृहात होणाऱ्या बैठकीत उपस्थित राहावे. ही विनंती सातारा जिल्हा समन्वयक शिव आरोग्य सेना श्री निमिष शहा यांनी केलेली आहे.
———————————————— फोटो -शिवसेना आरोग्य सेना लोगो

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments