ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक – राज्यपाल

मुंबई : सनातन धर्म हा केवळ धर्मच नाही; तर ती जीवन पद्धती आहे. सनातन धर्माने प्रत्येक धर्माचा स्वीकार व आदर केला आहे. सहिष्णुता व सर्वसमावेशकता ही सनातन धर्माची बलस्थाने आहेत. त्यामुळे मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

राज्यपाल राधाकृष्णन यांनी मुंबईतील महाराणी अहिल्यादेवी होळकर मैदान गोरेगाव येथे सुरु असलेल्या ४ – दिवसांच्या हिंदू आध्यात्मिक आणि सेवा मेळाव्याला गुरुवारी (दि. ९) संबोधित केले, त्यावेळी ते बोलत होते.

मेळाव्याचे आयोजन हिंदू आध्यात्मिक व सेवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

भारतातील लोक स्वभावतःच धर्मनिरपेक्ष आहेत. दयाभाव येथील संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळेच कोरोना महामारीच्या काळात भारताने कोविड लस स्वतःपुरती न वापरता जगातील गरीब देशांना देखील विनामूल्य उपलब्ध करून दिली, असे राज्यपालांनी सांगितले. त्यामुळे मानवतेच्या सेवेसाठी भारताला बलशाली होणे आवश्यक आहे, असे राज्यपाल म्हणाले.

यावेळी राज्यपालांनी मेळाव्यात आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. हे प्रदर्शन दि. ९ ते १२ जानेवारी पर्यंत सुरु राहणार असून या भारताच्या समृद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करणे हा या मेळाव्याचा उद्देश आहे, असे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाला हिंदू आध्यात्मिक आणि सेवा फाउंडेशनचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत सिंह कोठारी, शारदा रामप्रकाश बुबना,सीए के सी जैन, गिरीश भाई शहा तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Scroll to Top