ताज्या बातम्या
बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाँग मार्च’ स्थगित; पाणी संघर्ष चळवळीचा निर्णयपरिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणार

सातारा जिल्ह्यातील सर्वात चर्चेतील क्रिकेट सामने…. उद्यापासून नवी मुंबईत होणार कराड तालुका प्रीमियम लीग २०२४

प्रतिनिधी – हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत कराड तालुका प्रीमियम लीग २०२४ KTPL – 3 या क्रिकेट स्पर्धा शनिवार रविवार १३ व १४ एप्रिल २०२४ ला नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील भूमिपुत्र मैदानात होणाऱ्या या स्पर्धेत बक्षिसाची लयलूट तर होणारच पण ही स्पर्धा जिंकून गुलाल कोण उधळणार याचीच चर्चा सध्या मुंबईसह सातारा,कराड मधील क्रिकेट प्रेमी करताना दिसत आहेत. 

  सदर स्पर्धा कराड तालुका क्रिकेट असोशियन यांनी आयोजित केली असून या स्पर्धेत एकूण आठ संघमालक सहभागी होणार आहेत. आठ संघ आणि त्याचे खेळाडू ही स्पर्धा रंगवणार आहेत.

या स्पर्धेसाठी संघटनेचे आधारस्तंभ दीपक दादा लोखंडे असल्यामुळे कोणतीच गोष्ट कमी पडत नसते. हे सर्व खेळाडू व संघमालक यांना माहीत आहे. त्यांच्या जोडीला अध्यक्ष पै.विशाल पाटील सुद्धा ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

काही दिवसांपूर्वी या स्पर्धेचे सन्मानचिन्ह  अनावरण करण्यात आले होते. यावेळी आठ संघ मालक उपस्थित होते.यावेळी संस्थापक अध्यक्ष दीपक लोखंडे,अमित शेटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Scroll to Top