प्रतिनिधी –. फलटण तालुक्यातील आसू येथे हुतात्मा राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षीत जयंती व पुण्यतिथी निमित्त स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार वितरित आणि राज्यस्तरीय संमेलन सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याच्या निमित्ताने विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांना यावेळी सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन प्रोत्साहन देण्यात आले. साहित्यिकांमध्ये उत्कृष्ट गझल संग्रह, उत्कृष्ट कवितासंग्रह अशा निवडक साहित्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक देऊन व कादंबरी, कथासंग्रह अशा विविध साहित्यकृतींसाठी व साहित्यिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी साहित्य भूषण मा. श्री सत्यवान मंडलिक यांना ‘स्वातंत्र्याची ७५ वर्षे’ या वैचारिक साहित्य कृतीसाठी स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व वृक्षाचे रोपटे असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
या सोहळ्याच्या संमेलन अध्यक्षपदी श्री अरविंदभाई मेहता- ज्येष्ठ पत्रकार फलटण हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री हनुमंत चांदगुडे- पाठ्यपुस्तकातील कवी हे लाभले होते तर दुसऱ्या सत्रातील कवी संमेलनासाठी अध्यक्षपद विद्या दौलत सरपाते पोलीस पाटील गुंजखेड लोणी यांनी भूषविले. श्री पंडितराव लोहकरे- सचिव श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गोडगाव बार्शी, श्री रवींद्र बेडकीहाळ- अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण, श्री जीवन इंगळे गुरुजी- सर्वोदयी कार्यकर्ते गांधीधाम राजापूर, श्री रघुवीर नारायण माने-पाटील माजी कमिशनर सेल टॅक्स ऑफिसर व श्री प्रमोद सदाशिव झांबरे मा चेअरमन सातारा जिल्हा मजूर फेडरेशन सातारा, तसेच युवा कार्यकर्ते भैया खर्डेकर आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. या सोहळ्याचे प्रस्ताविक आयोजक श्री प्रकाश सकुंडे सर यांनी केले तर आभार श्री वसंत सकुंडे यांनी मानले.
