ताज्या बातम्या

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री अमित शहा यांची घेतली भेट

प्रतिनिधी : शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री श्री अमितभाई शहा यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल माननीय गृहमंत्र्यांचे या शिष्टमंडळाने अभिनंदन केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार संदिपान भुमरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार रवींद्र वायकर, खासदार मिलिंद देवरा, खासदार धैर्यशील माने आणि माजी खासदार राहुल शेवाळे हे उपस्थित होते.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top