सातारा(अजित जगताप) : १५व्या विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत . महायुती पुन्हा सत्तेत येणार हे अधोरेखित झालेले आहे. साताऱ्यातील छत्रपतींचे वंशज आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विक्रमी मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवा अशी मागणी मतदारांनी केली आहे.
निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये आत्मविश्वास न दाखवता निवडणूक प्रचार गांभीर्याने घेतला होता .आपला विजय निश्चित झाला असला तरी भाजपचे उमेदवार आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्राचार यंत्रणेत सहभागी झाले होते. मतदाराच्या ही दिवशी जावळी तालुक्यातील करहर केळघर कुडाळ सायगाव भागात आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले फिरत होते. मतदारांना कमळ चिन्ह लक्षात ठेवावे यासाठी प्रयत्न करत होते.त्याच्याच यश म्हणून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे एक लाख ४२,८२४ मताधिक्याने विजयी झालेले आहेत. त्यांच्या विजयाने सातारा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात डी.जे. व गुलाल आणि भंडारा उधळण्यात आला. रस्त्यावरती मोठी गर्दी झाल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली होती. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी फक्त साताऱ्यातील निवडणुकीत विजय मिळवला नाही तर कराड उत्तर, वाई – खंडाळा -महाबळेश्वर व कोरेगाव मतदार संघातही विजय मिळवण्यासाठी खारीचा वाटा उचललेला आहे. आता सातारा तालुक्यात दोन आमदार व एक खासदार असे संख्याबळ झाले आहे. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला सातारा जिल्ह्यात होता. त्यावेळी असणारे आता भाजपमय झालेले आहेत. त्यामुळे सातारचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मुख्यमंत्री केल्यास त्यांना सर्वजण साथ देतील. असा विश्वास मतदार व्यक्त करत आहेत. दिनांक २६ नोव्हेंबर रोजी नवीन मंत्रिमंडळ महाराष्ट्रात पाहण्यात मिळणार असून चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मुख्यमंत्री करावे अशी राष्ट्रवादी मतदार करू लागलेले आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठीनी ही त्याची नोंद घ्यावी. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे मुख्यमंत्री झाल्यास महाराष्ट्र आणखीन प्रगतीपथावर जाईल असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत.
सातारचे आ. शिवेंद्रसिंह राजे भोसलेंना मुख्यमंत्री करण्याची मतदारांची मागणी
RELATED ARTICLES