ताज्या बातम्या

पत्रकार दत्ता खंदारे “समाजरत्न” पुरस्काराने सन्मानित!

मुंबई : समाजरत्न पुरस्कार हा विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदान करण्यात येणारा एक प्रतिष्ठित सन्मान आहे.असाच एक पुरस्कार पत्रकारिता क्षेत्रात गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत असणारे पाक्षिक धारावी वार्ता १५वर्ष यशस्वीरित्या चालवून जनतेच्या समस्या सोडविणारे,साप्ताहिक भगवे वादळचे संपादक,उत्कृष्ट पत्रलेखक, स्तंभलेखक श्री दत्ता खंदारे यांना सृष्ठी संस्थां प्रायोजित “आम्ही वडाळा पूर्वकर”च्या८ व्या वर्धापनदिनी ८फेब्रुवारी २०२६ रोजी मान्यवर व्यक्तीच्या हस्ते “समाजरत्न” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.पुरस्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून दत्ताराम दळवी( माजी अध्यक्ष मुंबई वृत्तपत्र लेखक संघ),भाऊ सावंत,( अध्यक्ष हुतात्मा स्मारक कमिटी),असुंता डिसोझा( सामाजिक कार्यकर्त्या),हेमलता सदाशिवम( सामाजिक कार्यकर्त्या),युसूफ दरबार,( जेष्ठ संगीतकार ब्यांजो वादक),सुधाकर काश्यप्य ( जेष्ठ पत्रकार),आनंद प्रभू ( जेष्ठ मनसे नेते)सुनील शिंदै ( जेष्ठ पत्रकार),भगवान भुसारा ( मुख्याध्यापक ) सुफियान वनू( माजी नगरसेवक ) उपस्थित होते.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top