ताज्या बातम्या

२१नोव्हेंबर संयुक्त महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिन साजरा



मुंबई(विशाल जाधव) : मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी मधून 1 मे 1960 दिवशी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मराठी माणसासाठी हा अभिमानाचा दिवस असला तरीही त्यासाठी 105 हुताम्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. त्यांच्या बलिदानाच्या स्मृती प्रित्यर्थ 21 नोव्हेंबर हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी हुतात्मा स्वीकारण्याचं स्मरण केले जाते. मुंबईत फ्लोरा फाऊंटनवरील त्यांच्या स्मृतिस्थळावर आदरांजली अर्पण केली जाते. आज महाराष्ट्र राज्याचा डंका जगभरात पोहचला आहे पण या राज्याची नेमकी निर्मिती झाली कशी? कोणकोणत्या आव्हानांना पार करून मराठी माणसाने महाराष्ट्र राज्य उभं केलं याबद्दलच्या इतिहासातील या काही घटना आजच्या महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनी (Maharashtra Hutatma Smruti Din) या निमित्त पत्रकार श्री.सतिश वि.पाटील व सहकारी यांनी पुष्पहार व दिपज्योत लावून आपल्या प्राणाची बाजी लावणारे १०५ हुतात्म्या यांना श्रध्दांजली वाहली !

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top