प्रतिनिधी : महाराष्ट्रात महायुती आघाडीच्या एकतर्फी विजयाच्या झंझावातामध्ये काँग्रेससह आघाडीतील अनेक बड्या नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड (दक्षिण) विधानसभा मतदारसंघातून ३९,३५५ मतांनी पराभव झाला आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात चव्हाण यांना १.००.१५० मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांना १,३९,५५५ मते मिळाली. चव्हाण यांचा पराभव हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे, कारण ते २०१४ पासून कराड (दक्षिण) मतदारसंघाचे आमदार होते. ७८ वर्षीय चव्हाण २०११ ते २०१४ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचा पराभव असून यापुढे कराड दक्षिणचे नेतृत्व डॉ अतुल भोसले यांच्याकडे असेल,आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील भाजपा आपले वर्चस्व कायम ठेवण्यात प्रयत्नशील राहतील अशी परिस्थिती या निकालामुळे निर्माण झाली आहे.
काँग्रेसला मोठा धक्का; कराड दक्षिण मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव
RELATED ARTICLES