ताज्या बातम्या

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची अशी काय झालीये अवस्था? ओळखणंही झालं कठीण

Aai Kuthe Kay Karte Actress Photo Viral: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील एका लोकप्रिय अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तिला ओळखणंही कठीण झालं आहे.

मुंबई: मराठी मनोरंजन विश्वात नवनवे प्रयोग नेहमीच पाहायला मिळतात. विविध कलाकार कल्पनेपलीकडे जाऊन एखाद्या भूमिकेसाठी मेहनत घेतात आणि त्याकरता स्वत:चं रुपही बदलून टाकतात. एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या लेटेस्ट फोटोमधून असाच काहीसा प्रकार पाहायला मिळतो आहे. या अभिनेत्रीने स्वत:च्या सोशल मीडिया प्रोफाइलवर हा फोटो शेअर केला. अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार तिच्या आगामी सिनेमासाठी तिने हा लूक केला आहे. तुम्ही ओळखलं का ही अभिनेत्री नेमकी कोण आहे?

या फोटोतील अभिनेत्री ‘आई कुठे काय करते’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. याशिवाय मालिकाविश्वात तिने ऐतिहासिक भूमिकांमधून लक्ष वेधले आहे. AKKK च्या चाहत्यांनी या हिंटनंतर अभिनेत्रीला नक्कीच ओळखलं असेल!

ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतीन अनघा आहे. अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडेने तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर हा फोटो शेअर केला. ज्यामध्ये तिने गुलाबी रंगाची फाटकी साडी अन् फाटका ब्लाऊज परिधान केला आहे. तिचे केसही विस्कटलेले आहे. कित्येक दिवस तोंडाला पाणी न लागल्यासारखा तिचा झाला आहे. अभिनेत्रीचा हा फोटो तिच्या आगामी प्रोजेक्टदरम्यानचा आहे. याविषयी तिने इन्स्टाग्राम कॅप्शनमध्ये माहिती दिली.

https://www.instagram.com/p/DCB4bDjCGBV/?igsh=M2k3em02dWdsdHQ5

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top