ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

धारावीत मनोहर रायबागे यांच्या प्रचार रॅलीला प्रचंड प्रतिसाद

प्रतिनीधी : धारावी विधानसभा निवडणूक चुरशीची होत चालली आहे. यामध्ये महाविकास आघाडी, महायुती आणि बहुजन समाजवादी पार्टी यामध्ये लढत असली तरी तिन्ही पक्षाने प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामध्ये बहुजन समाजवादी पार्टीचे उमेदवार मनोहर रायबागे यांच्या प्रचार रॅलीला उदंड प्रतिसाद मिळत आहे. धारावीतील प्रभाग क्रमांक 183 मध्ये रायबागे यांच्या रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती जाणवत होती. आणि जागोजागी रायबागे यांचे जंगी स्वागत करण्यात येत होते. त्यामुळे महाविकास आघाडी,  बहुजन समाजवादी पार्टी आणि महायुती यामध्ये चुरस बघायला मिळणार आहे. निवडणूक 20 नोव्हेंबरला असली तरी आतापासूनच प्रचाराला रंगत आलेले चित्र धारावीत दिसत आहे.

Scroll to Top