ताज्या बातम्या

मनपा’चे एफ/साऊथ नागरी सुविधा केंद्रच ठरली नागरिकांना असुविधेचे केंद्र

मुंबई :  नागरिकाला केन्द्रबिंदू ठेवून संगणकाचा वापर करत आज सर्वच शासकीय विभाग अद्ययावत होत आहे. नागरिकांना सहजतेने सुविधा कशी उपलब्ध करुन देता येईल या उद्दात हेतूने नवनवीन तंत्रज्ञानाचा स्विकार जवळ जवळ सर्वच सरकारी, निमसरकारी, स्वराज्य संस्था यांनी केलेला दिसतो. सीएफसीच्या माध्यमातुन जन्म दाखला, मृत्यू दाखला, कर भरणे नाना तऱ्हेचे दाखले इत्यादीच काम होत असते. एफ/साऊथ विभागाच्या सीएफसी केंद्राच्या ढिसाळ कामगिरीमुळे नागरीक त्रस्त.

       अशाच नगरिकांपैकी एक शाकीब पिरजादे. वाडिया हॉस्पिटलमध्ये शाकिब यांच्या पत्नीने एप्रिल महिन्यात मुलाला जन्म दिला. मुलाचा जन्म दाखल काढण्याकरिता शाकीब एप्रिल महिन्यापासून मनपाच्या एफ/साऊथ विभागातील सीएफसी केंद्रात चक्कर मारत आहेत. केंद्रात गेल्यावर सर्व्हर चालू नाही. जवळ जवळ चार ते पाच वेळेस सीएफसी केंद्रात सतत चक्कर मारल्यानंतर देखील ही अद्याप त्यांच्या मुलाचा जन्म दाखल्याचे काम झाले नाही. सरकारी काम आणि सहा महिने थांब याच म्हणीचा प्रत्यय वारंवार नागरीकांना केंद्रात येत असल्याचे दिसते. सर्व्हरमुळे दुसऱ्या दिवशी होणाऱ्या गर्दीत पुर्ण दिवस रांगेत निघून जातो. 

अशा कामासाठी पुर्ण दिवसाची सुट्टी काढावी लागते. वेगवेगळ्या ठिकाणाहून नागरीक आपापले काम करण्यासाठी या केंद्रात आले असता आज सर्व्हर बंद आहे हे कानावर येताच नागरिक निराश होऊन कार्यालयाबाहेर पडतात. महापालिकेने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन दिले पाहिजे अशी इच्छा नागरिक व्यक्त करत आहे. जेणे करुन आमचा दिवस फुकट वाया जाणार नाही. व नागरिकांना त्रास होणार नाही.

Scroll to Top