नुकतात्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता दल सेक्युलर पक्षाने देशाभरात NAD च्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न केले आहे. जनता दल सेक्युलर पक्ष हा महाराष्ट्रात महायुतीचा घटक पक्ष म्हणून काम करत असताना महाराष्ट्र मध्ये महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जनता दल सेक्युलर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. तर केंद्रात माजी पंतप्रधान आदरणीय एच.डी. देवेगौडा साहेब यांनी NDA पाठींबा देत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यसाठी प्रयन्त केले आहे. याच पार्श्वभूमीवर NAD यांनी मा.एच.डी. कुमारस्वामी यांना अवजड उद्योग व स्टील खात्याचे मंत्री पद देऊन त्यांचा सन्मान केला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र मधील जनता दल सेक्युलर पक्षाच्या पदाधिकारी यांना सत्तेमध्ये सामावून घ्यावे अशी मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी पत्रकार परिषद मध्ये बोलताना केली. दरम्यान जनता दल सेक्युलरचे पदाधिकारी लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, भा.ज.पा.प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे व महायुती समन्वयक आमदार प्रसाद लाड यांची भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागा मागणार आहे. तसेच २५ मतदार संघाचे संभाव्य उमेदवार यांची तयारी चालू असून आगामी काळात लढण्याची तयारी केली आहे. या बैठकीसाठी मुंबई उपाध्यक्ष सुहास बने, सुरेंद्र कुमार वाजपेयी, अजमल खान, प्रेमचंद पांडेजी, निलेश कंथारीया, महिला अध्यक्ष ज्योती बढेकर, भगवान साळवी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्राप्रमाणे महाराष्ट्रात महायुतीने जनता दल सेक्युलर ला सत्तेमध्ये सहभागी करून घ्यावे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांची मागणी
RELATED ARTICLES