
प्रतिनिधी : सौर उर्जेवर चालणाऱ्या उपकरणांना प्राधान्य द्यावे या साठी राज्य व केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहेत, परंतु त्याचा गैरफायदा घेत काही कंपन्या ग्राहकांची फसवणूक करत आहेत.अशीच एक तक्रार लातूर येथील एका शेतकरी कुटुंब जाधव यांनी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षा कडे केली.त्या अनुषंगाने शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे सचिव श्री निखिल सावंत यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने एमफिन इंडिया प्रा.ली या कंपनीचे संचालक श्री राजपूत यांची मालाड येथील कार्यालयात भेट घेतली व सदर तक्रारी संदर्भात जाब विचारला.सदर शिष्ट मंडळात कक्षाचे खजिनदार देविदास माडये,लोकसभा समन्वयक संजय पावले, ॲड.अभिराज परब कक्ष विधानसभा संघटक विक्रम शाह,कार्यालय चिटणीस शारदा घुले, उप संघटक विजय पवार, अजय सावरकर,आशा रजक उपस्थित होते.