मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून प्रचाराता गुलाल उधळताना दिसत आहे. सभांचा धडाका आणि एकापेक्षा एक आश्वासन देत सर्व पक्षांकडून प्रचार सुरु आहे. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केल्याचं दिसत आहे. भाजपनेही आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी , अमित शाह , जेपी नड्डा तर महाराष्ट्रातील नितीन गडकरी , देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांच्या नावाचा समावेश आहे. भाजपच्या प्रचार प्रमुखांच्या यादीत 26 जणांचा समावेश आहे.
भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी
आगामी निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपची फौज मैदानात उतरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे हे सर्व पक्षाचा प्रचार करताना दिसतील. भाजपच्या प्रचार प्रमुखांच्या यादीत 7 केंद्रीय मंत्री, 6 मुख्यमंत्री, खासदार, प्रदेशाध्यक्ष प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत.
महाराष्ट्रात भाजपकडून कोण कोण प्रचार करणार,
पंतप्रधान नरेंद्र मोदी ,राजनाथ सिंह- संरक्षण मंत्री
,अमित शाह – गृहमंत्री, जेपी नड्डा – भाजप, राष्ट्रीय अध्यक्ष, नितीन गडकरी – केंद्रीय मंत्री, देवेंद्र फडणवीस – उपमुख्यमंत्री, योगी आदित्यनाथ – मुख्यमंत्री उत्तर प्रदेश, प्रमोद सावंत – मुख्यमंत्री, गोवा, भूपेंद्रभाई पटेल – मुख्यमंत्री, गुजरात, विष्णू देव साई – मुख्यमंत्री, छत्तीसगड, डॉ. मोहन यादव – मुख्यमंत्री, मध्यप्रदेश, भजनलाल शर्मा – मुख्यमंत्री, राजस्थान, पीयूष गोयल – केंद्रीय मंत्री, अनुराग ठाकूर – केंद्रीय मंत्री, ज्योतिरादित्य शिंदे – केंद्रीय मंत्री, स्मृती इराणी – केंद्रीय मंत्री, सम्राट चौधरी – उपमुख्यमंत्री, बिहार, के. अण्णा मलाई – प्रदेश अध्यक्ष, तामिळनाडू, मनोज तिवारी – माजी प्रदेश अध्यक्ष दिल्ली, रवि किशन – खासदार, विनोद तावडे – राष्ट्रीय सरचिटनीस, शिव प्रकाश – राष्ट्रीय सहसंगठन मंत्री, शिवराज सिंह चौहान – माजी मुख्यमंत्री, दिनेश शर्मा – प्रदेश निवडणूक प्रभारी
,निर्मल कुमार सुराणा – प्रदेश निवडणूक सहप्रभारी
,जयभान सिंह पवैय्या – प्रदेश निवडणूक सहप्रभारी अशी असेल भाजपा स्टार प्रचारकांची यादी
भाजपच्या प्रचार प्रमुखांच्या यादीत मोदी,शहा,नड्डा,तावडे सह फडणवीस,योगी 7 केंद्रीय मंत्री, 6 मुख्यमंत्री व इतर स्टार प्रचारक
RELATED ARTICLES