Monday, August 4, 2025
घरमहाराष्ट्ररा.प.म. (एस.टी)चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली वर्षा निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री...

रा.प.म. (एस.टी)चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली वर्षा निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणेशाची मनोभावे आरती

मुंबई (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर ) :
राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी) चालक वाहक आणि इतर शेकडो कर्मचाऱ्यांनी आज वर्षा निवासस्थानी येऊन विराजमान झालेल्या श्री.गणेशाची मनोभावे आरती केली.यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांनी सर्वांसोबत संवाद साधत या सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
आजपर्यंतच्या इतिहासात एस.टी. कर्मचाऱ्यांना कोणत्याही मुख्यमंत्र्याने वर्षा बंगल्यावरती गणपतीच्या आरतीचा मान दिला नव्हता.त्याचप्रमाणे यंदा राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना(एस.टी.)भरघोस पगारवाढ देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी दिली.राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी (एस.टी.)मान.मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांचे आभार मानले आणि गणपती बाप्पा कडे साकडे घातले की मा.एकनाथजी शिंदे हेच मुख्यमंत्री आम्हाला कायमस्वरूपी लाभोत.याप्रसंगी शिवसेना सचिव/प्रवक्ते, राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री.किरण पावसकर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments