प्रतिनिधी : भविष्यवेत्ते बाबा वेंगांच्या भविष्यवाणीवर जगभरातील लोक विश्वास ठेवतात. बाब वेंगांनी प्रत्येक वर्षाप्रमाणे २०२४ साठीही भविष्यवाणी केलेल्या आहेत. त्यात त्यांनी २०२४ मध्ये हवामाच्या संबंधित घटना आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पृथ्वीवर मोठा बदल घडणार आहे. असा बदल मोठा कालावधी लोटल्यानंतर होतो. पृथ्वीवर चोहोबाजूंनी मोठा विध्वंस होऊ शकतो, असे भाकित वर्तवले आहे.
या भविष्यवाणीचा अर्थ लावून सायबर हल्ल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होणार असल्याचे सांगितले आहे. २०२४ मध्ये हॅकर्स पॉवर ग्रिड आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांटला लक्ष्य करू शकतात. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होईल. मागच्या काही महिन्यांत अनेक मोठ्या कंपन्यांनी सायबर सुरक्षा हल्ल्यांची अनेक प्रकरणे उघड केली आहेत. या वर्षी जागतिक अर्थव्यवस्थेला हादरवून सोडणारे मोठे आर्थिक संकट येण्याची शक्यता बाबा वेंगांनी व्यक्त केली होती. यासाठी अनेक कारणे सांगण्यात आलेली आहेत. कर्जाची वाढती पातळी, वाढता भू-राजकीय तणाव आणि आर्थिक शक्तीचे पश्चिमेकडून पूर्वेकडे स्थलांतर, या घटनांचा समावेश आहे.
बाबा वेंगा यांनी असे भाकित केले आहे की, २०२४ मध्ये एक मोठा देश जैविक शस्त्रांची चाचणी किंवा हल्ला करेल. तसेच युरोपमध्ये दहशतवादी हल्ल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. बाबा वेंगा यांनी मृत्यूपूर्वी ५०७९ वर्षापर्यंत भाकीत केले आहे. त्यांच्या भाकितानुसार ५०७९ मध्ये जगाचा अंत होईल.