मुंबई (शांताराम गुडेकर ) दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया आणि दिव्यांग व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशनच्या यांच्या सानिध्याखाली "डिसिसिबीआय ऑल ऍबिलिटी क्रिकेट चॅम्पिअनशिप" चे दिनांक ९ आणि १० एप्रिल २०२४ रोजी सचिन तेंडुलकर जिमखाना कांदिवली येथे ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या स्पर्धेत दिव्यांग पुरुष क्रिकेट, दिव्यांग महिला क्रिकेट, व्हीलचेअर क्रिकेट, अंध क्रिकेट आणि मूक-बधिर क्रिकेटचे एक एक सामने दोन दिवसात खेळवले जाणार आहेत. पूर्ण भारतातून १५० दिव्यांग क्रिकेट खेळाडू सहभागी होणार आहेत.
दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाच्या माध्यमातून आता पर्यंत १०० हुन अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. तसेच ह्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडू पैकी काही खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहेत. हि स्पर्धा देशातील पहिली अशी स्पर्धा आहे कि, ज्यामध्ये दिव्यांगांच्या सर्व प्रकारचे क्रिकेट एका टुर्नामेंट मध्ये एकत्रित खेळवण्यात येणार आहे.
९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंध क्रिकेट, मूक बधिर क्रिकेट आणि महिला क्रिकेटचे सामने १५/ १५ ओव्हरचे खेळवले जातील.१० एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत दिव्यांग पुरुष क्रिकेट आणि व्हीलचेअर क्रिकेटचे २०/२० ओव्हरचे सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेत जो संघ जिंकणार त्याला ११०००/-रु. रोख रक्कम आणि ट्रॉफी तसेच उपविजेता संघाला ७०००/-रु. रोख रक्कम आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे.
दिव्यांग क्रिकेट मध्ये खूप प्रकार आहे त्याची कोणाला हि माहिती नाही आहे त्यासाठी दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाचे सचिव – हारून रशीद , सहअध्यक्ष – भगवान तलवारे, अध्यक्ष मुंबई / महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट विभाग – भाग्यश्री वर्तक आणि सह सचिव आणि व्हीलचेअर क्रिकेटर विभागाचे प्रमुख रमेश सरतापे यांनी मिळून ह्या स्पर्धेचे आयोजन केले त्यामुळे दिव्यांग क्रिकेटला सर्वांसमोर आणण्यात येईल. ह्या स्पर्धेच्या आयोजनासाठी अजिंक्य नाईक , अमोल काळे , नीरज गुंडे यांनी सहकार्य दाखवले आहे.