Sunday, December 15, 2024
घरमनोरंजनअभिनेते किरण माने 'आयसीयु' मध्ये

अभिनेते किरण माने ‘आयसीयु’ मध्ये

मुंबई: अभिनेते किरण माने यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर करत चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. नेहमी मानेंच्या राजकीय आणि सामाजिक विषयांवरील पोस्ट व्हायरल होतात आणि त्यावर चर्चा केली जाते. आता त्यांनी स्वत:च्या आरोग्यविषयक पोस्ट शेअर केली असून यानंतर चाहते त्यांना लवकरात लवकर बरे वाटावे याकरता प्रार्थना करत आहेत. त्यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले. माने यांनी या पोस्टमधून नेमके काय घडले हे सांगितले नसले तरी, हे समोर आले आहे की ते आयसीयूमध्ये होते.

 किरण माने यांची फेसबुक पोस्ट?

किरण माने यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, ‘काल दुपारपर्यंत फिट, तंदुरुस्त, हसत खेळत होतो… आज आयसीयू, सलाइन, इंजेक्शन, गोळ्या, तपासण्या आणि प्रचंड असह्य वेदना! आयुष्य किती अनप्रेडिक्टेबल असतं! अर्थात यावरही मात करुन यातून बाहे पडेन. फिकीर नॉट’. नेहमी लांबलचक पोस्ट लिहिणाऱ्या अभिनेत्याने अशी छोटी पोस्ट लिहून सर्वांनाच धक्का दिला आहे. चाहतेही त्यांना लवकरात लवकर बरे वाटावे याकरता प्रार्थना करत असून त्यांना काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत.

माने नेमके कशामुळे आजारी पडले किंवा ते कोणत्या आजाराचा सामना करत आहेत, याविषयी कोणतेही अपडेट समोर आलेले नाही. फेसबुकवर आरोग्यविषयक पोस्ट शेअर करण्याआधी त्यांनी अशीही पोस्ट केलेली की, ‘सिंपथी मिळवणं सोपं असतं. कोणाही दुबळ्या, हतबल माणसाला ती सहज मिळते. जेलसी लय कष्टाने कमवावी लागते, संघर्ष करुन यश मिळवणाऱ्या जिगरबाजालाच ती लाभते’. मंगळवारी दुपारी १२च्या दरम्यान त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे त्यानंतरच्या काही तासातंच त्यांची तब्येत बिघडली असावी असा अंदाज आहे.

सध्या ते सन मराठीवरील ‘तिकळी’ या मालिकेत खलनायकी भूमिका साकारत आहेत. याशिवाय त्यांनी ‘मुलगी झाली हो’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिका आणि ‘बिग बॉस मराठी ४’ या शोमधून तुफान लोकप्रियता मिळवली आहे. मराठी रंगभूमीवरील एक कसलेला कलाकार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. अलीकडेच त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा झेंडा हाती घेतला. एकंदरितच माने यांचा मोटा चाहतावर्ग असून तब्येत बिघडल्यानंतर त्यांना बरे वाटावे याकरता हे चाहते प्रार्थना करत आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments