सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत गेली अनेक महिने रखडलेल्या पदोन्नती प्रक्रिया आज पार पाडली. पोलीस बंदोबस्तामध्ये शिक्षकांचे केंद्रप्रमुख मान्यता देण्यात आली. दोन दिवसात दिव्यांगबाबत कागदपत्र दाखल केल्यानंतरच त्यांना आदेश देण्यात येणार आहेत. सातारा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही प्रक्रिया झाली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रप्रमुख म्हणून प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती देण्यात आली. यावेळी १६२ जणांच्या जाहिर केलेल्या सेवा ज्येष्ठतेच्या यादीनुसार १४५ शिक्षक हे केंद्र प्रमुख बनले तर ३९ जणांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदारसंघात जाण्यास चक्क नकार दिला आहे .
जावळी आणि फलटण तालुक्यातील शाळांना प्रथम प्राधान्य मिळाले.पदोन्नतीसाठी प्राथमिक शिक्षक व शिक्षिका हे सातारा जिल्हा परिषदेमध्ये आले होते.सकाळी १० वाजता पदोन्नती बाबत प्रक्रिया राबविण्यात येणार होते. यासाठी प्रतिक्षा यादीतील शिक्षिका व शिक्षक जिल्हा परिषदेच्या आवारात आले होते. प्रत्यक्ष दुपारी तीन वाजता पदोन्नती प्रक्रिये बाबत माहिती देण्यात आली. काहींना सत्य कागदपत्रांसह लवकरात लवकर दाखल करण्याची सक्त सुचना सगळ्यांना दिल्या. कोणाला काही तक्रार करायची असेल तर त्यासाठी अवधी दिला गेला होता. त्याच काळात तक्रारी ज्यांनी केल्या. त्यांना तसे उत्तर दिले गेले आहे. परंतु आता कोणी जर आरोप करत असेल तर ते ऐकून घेणार नाही, अशा शब्दात ठणकावत प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी सातारा जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांच्यासह शिक्षण विभागाचा सर्व कर्मचारी उपस्थित होते. सुरुवातीला दिव्यांगाना प्राधान्य देण्यात आले. अस्थिव्यंग आणि दिव्यांगाना पदोन्नती देण्यात आली. ज्यांचे युआयडी कार्ड नसतील त्यांनी दोन दिवसात युआयडी कार्ड सादर करावेत, अन्यथा नियुक्ती आदेश दिले जाणार नाहीत, अशा सुचना स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी दिल्या. सुरुवातीची यादी ही १०५ जणांची होती. त्यातील ३९ जणांनी नकार घंटा दिल्याने प्रतिक्षा यादीतील शिक्षकांना संधी दिली गेली. त्यामुळे १४५ शिक्षक पदोन्नतीने केंद्र प्रमुख बनले आहेत .
जिल्हा परिषदेमध्ये २०२१ च्या पदोन्नतीवेळी शिक्षकांच्या गटामध्ये हमरीतुमरीचा प्रकार झाली होती. त्यामुळे योग्य खबरदारी म्हणून सातारा जिल्हा परिषद प्रशासनाने सातारा शहर पोलीस ठाण्याचा बंदोबस्त बोलवला होता. एका पोलीस अधिकाऱ्यांनी काही शिक्षक व नियमितपणे सातारा जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या पत्रकारांनाही धक्काबुक्की केली. या पोलीस अधिकाऱ्यांना आपण पत्रकार व शिक्षकांना धक्काबुक्की करतो. याचे सुद्धा भान राहिले नव्हते. त्यांनी आपल्या वर्दीचा धाक गुंडांवर दाखवावा. अशी प्रतिक्रिया काही शिक्षकांनी दिली.
या पदोन्नतीच्या प्रक्रियेसाठी शिक्षक समितीचे नेते व शिक्षक बँकेचे चेअरमन किरण यादव, विश्वंभर रणनवरे, नवनाथ जाधव, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, महेंद्र जानुगडे, अखिल भारतीय शिक्षक संघाचे दीपक भुजबळ श्रीमती गंगावणे, श्री धनवडे यांच्यासह सर्वच शिक्षक नेत्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन आणि शिक्षणाधिकारी श्रीमती शबनम मुजावर यांचे आभार मानले. शिक्षण देणे हे पवित्र काम असूनही पाटण तालुक्यात जाण्यासाठी ज्या ३९ सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यांच्या बाबत आता पाटण तालुक्यामध्ये नाराजी उमटू लागली आहे. पाटण तालुक्यातील ज्यांनी नकार दिला त्यांना त्यांच्या घराच्या शेजारच्या शाळेमध्ये नेमणूक द्या. अशी उपराधात्मक मागणी धरणग्रस्तांच्या प्रश्नांची जाण असणारे युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते चैतन्य दळवी यांनी केली आहे.
सेवा ज्येष्ठतेनुसार सातारा जि. प. प्रा. शिक्षकांना केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती….
RELATED ARTICLES