ताज्या बातम्या

एप्रिल महिन्यात मराठी चित्रपटांची ‘रणधुमाळी’; संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटीलसह ‘हे’ चित्रपट रिलीज होणार

प्रतिनिधी :  एप्रिल  महिन्यात बॉलिवूडसह  अनेक मराठी चित्रपटदेखील  प्रदर्शित होणार आहेत. एकंदरीत एप्रिल महिन्यात मराठी चित्रपटांची रणधुमाळी असणार आहे. ‘संघर्षसोद्धा मनोज जरांगे पाटील’  या चित्रपटासह आणखी काही मराठी चित्रपट या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सिनेमांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. एकीकडे ‘बडे मिया छोटे मिया’, ‘मैदान’ , ‘JNU’ या सिनेमांची बॉक्स ऑफिसवर रेलचेल असणार आहे. तर दुसरीकडे याच दरम्यान ‘मायलेक’ (Mylek), ‘लेक असावी तर अशी’, ‘जुनं फर्निचर’ (Juna Furniture)आणि ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 

 लोकसभा निवडणुकीत आयुष्यमान खुरानाला मिळाली मोठी जबाबदारी

 बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराना (Ayushmann Khurrana) हा आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखला जातो. आयुष्यमान खुराना अनेकदा सामाजिक मुद्यावरही भाष्य करतो. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुष्यमानला मोठी जबाबदारी मिळाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आयुष्यमान खुरानाला युथ आयकॉन म्हणून नियुक्त केले आहे. आता आयुष्यमान खुराना आता नागरिकांना, तरुणांना मतदानासाठी आवाहन करणार आहे.  

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top