Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रपांचगणीतील दिया कंनवा हीने आशियाई साम्बो चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले : पांचगणीत काढली...

पांचगणीतील दिया कंनवा हीने आशियाई साम्बो चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले : पांचगणीत काढली भव्य मिरवणूक

पांचगणी(रविकांत बेलोशे) : पांचगणी आजोळ असणाऱ्या आणि राजस्थानातील झुंझुनू जिल्ह्यातील उदयपुरवती येथे वास्तव्य करीत असणाऱ्या येथील दिया कंनवा हिने आशियाई साम्बो स्पर्धेत कास्य पदक जिंकून केवळ प्रदेशच नव्हे तर संपूर्ण राजस्थान आणि भारताचे नाव उंचावले आहे. याबरोबरच तिने पांचगणीचेही नाव उंचावले आहे. या यशाबद्दल पाचगणीकर रहिवाश्यांनी तिची पदकासह शहरातून भव्य अशी मिरवणूक काढली.
दिया कंनवा हीने पदक मिळवताच पांचगणी येथे ती राहत असणाऱ्या सिद्धार्थ नगर येथील रहिवाशांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. आज ती पांचगणी मध्ये येणार असल्याचे समजताच दिया ची भव्य अशी मिरवणूक काढण्याचा संकल्प नागरिकांनी केला. दुपारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही मिरवणूक बाजार पेठेकडे निघाली. यामध्ये डी जे आणि उघड्या जीपमधून पदक विजेत्या दियाची रॅली निघाली. ठिकठिकाणी रियाचे पुष्पहार घालून नागरिकांनी स्वागत केले. छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली बाजारपेठेतून सिद्धार्थ नगर कडे रवाना झाली.

दिया कणवा हीचा जन्म तसा पांचगणी मधीलच अगदी सर्वसामान्य कुटुंबातील आहे. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण पांचगणी या जागतिक दर्जाच्या शैक्षणिक केंद्रावर झाले. त्यानंतर तीच मूळ गाव असणाऱ्या राजस्थान मध्ये तिने पुढील शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि ती राजस्थानला गेली. त्याठिकाणी अकॅडमी मध्ये शिक्षण घेताना साम्बो या खेळाकडे आपले लक्ष केंद्रित केले. या खेळात तिने अनेक स्पर्धा जिंकल्या आणि तिची भारताच्या संघातून
आशियाई साम्बो चॅम्पियनशिप २०२४ साठी निवड झाली. ही स्पर्धा चीनमधील मकाऊ शहरात पार पडली या ठिकाणी आपल्या चांगल्या खेळाचे प्रदर्शन करीत दिया कणवा हीने आंतरराष्ट्रीय स्तरावरिल कांस्यपदक जिंकले. यामुळे तिने पांचागणीचे ही नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवले आहे.

दीयाने साम्बो स्पर्धेत कांस्यपदक जिंकून आपल्या पालकांचा अभिमान वाढवला आणि त्याचवेळी दिया कनवाने मकाऊच्या मातीवर भारताचा तिरंगा फडकवला. दियाने आपल्या यशाचे श्रेय तिचे आई, वडील , मामा, मामी, भारतीय साम्बो फेडरेशनचे पदाधिकारी, राजस्थान क्लब आणि पाचगणीत जिथं ती वाढली तेथील नागरिकांना दिले आहे.

दियाच्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर दियाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तिची प्रतिभा सिद्ध केली आहे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तिच्या प्रदेशाचा आणि तिच्या कुटुंबाचा झेंडा फडकवला आहे. यामुळे पांचगणी कर नागरिकांची सुद्धा आनंद व्यक्त केला असून तिचे अभिनंदन केले आहे.
सोबत फोटो आहे.
पांचगणी : कांस्य पदक विजेत्या दिया कनवा हीची अशा प्रकारे पाचगणीत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली (रविकांत बेलोशे सकाळ छाया चित्र सेवा)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments